मी एक ८१ वर्षांचा स्थापत्य अभियंता (Civil Engineer) असून स्थापत्य सल्लागार म्हणून आजही कार्यरत आहे. व्यवसायाच्या बरोबरीने मी व माझ्या धर्मपत्नीने मिळून आमचे व्यक्तीगत असे काही छंद आवडीने जोपासले आहेत. पुढे त्याची थोडक्यात माहिती देत आहे.१) सौर वॉटर हिटर २४.०१.२००१ ला बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून २४x७x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. एकूण खर्च २३,५०५/-(दरमहाची बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे)
२) घरातील सर्व प्रकारच्या ओल्या कचर्यापासून बायो-गॅसची निर्मिती संयंत्र ०१.०७.२००६ ला बसवून घेतले असून तेंव्हा पासून माझ्या L.P.G.गॅस सिलिंडरच्या वापरात २१ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे,त्याचप्रमाणे गॅस निर्मिती झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/-
३) आम्ही नोव्हेंबर २००९ पासून १४’ x १०’ च्या गच्चीवर घरातील ओल्या कचर्यापासून बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच ओल्या कचर्यापासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचाचोथा,कोथिंबीर,पालक,शेपू,मेथी,चाकवत,अंबाडी,माठ,चुका,मुळा,करडई इत्यादि भाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली,बिरड्यांचीसाले,कलिंगड,फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी,लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ,नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) विविध ४० हून जास्त प्रकारची फळझाडे (आंबा,पेरु,चिक्कू,डाळिंब,अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) लावली असून वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.
भाजीपाला(वांगी,टोमॅटो,पालक,मेथी,कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. फुलझाडे(अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद,निशिगंध,पारीजातक,रातराणी, झेंडू,अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा,सदाफुली,तगर,ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पन्न घेत आहे.सोबत आमच्या बायो क्ल्चरचे काही फोटो नमुन्यादाखल दिलेले आहेत
४) रोजचे अन्न शिजवण्यासाठी सौर कुकर चा ०७.११.२००९ पासून वापर सुरू केला आहे. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या,बटाटे,चिकन,मटण,पुरण सुद्धा उत्तम शिजतेच पण ह्या कुकरमध्ये दूधाची बासुंदी सुद्धा न करपता होते. (खर्च २,६००/-)
५) व्हर्मी-कल्चर म्हणजेच गांडूळ खताची निर्मिती १२.०९.२०१० पासून सुरू केलेली आहे. त्यापासून निर्माण होणारे जैविक खताचा वापर बायो-कल्चरसाठी केला जातो. खर्च २,८००/-
६) ०१ जानेवारी २०११ पासून मी घराच्या छतावर दोन ८० वॅट्ची सौर पँनेल्स व १८० वॅट्ची बॅटरी बसवून घेतली असून त्यापासून घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर दिवाणखान्यातील १८ वॅटची एक ट्यूब ,स्वयंपाकघरातील १८ वॅटची एक ट्यूब , जिन्यातील ९ वॅटचे L.E.D.चे चार दिवे ,व गच्चीवरील एक ९ वॅटचा दिवा असे सर्व दिवे आता पुर्णपणे सौर उर्जेवर चालतात.
७) वरील ६ नावीन्यपूर्ण गोष्टीखेरीज गेल्या ८ -१० वर्षांपासून आम्ही घरातील सर्व मंडळींनी मिळून एक आगळावेगळा असा मुलूखावेगळा छंद जोपासला आहे व तो म्हणजे विविध माध्यमातील अत्यंत दुर्मिळ असा 'गणेश मुर्तींचा संग्रह'(Museum of Lord Ganesh Idols) ह्यामध्ये विविध माध्यमातील उदाहरणार्थ लाकूड,काच,कागद,कापूस,कागदाचालगदा,लोकर,सोने, चांदी,विविधप्रकारचेदगड(Laterite,Sand,Teraacotta,Marble,Ganite,Gagoti etc.) ,शहाळे,धान्य.धातू,मणी हयातून साकारलेल्या ४००० हून जास्त दुर्मिळ गणेश मूर्ती,कि-चेन्स,नाइट लँम्प्स,भेट कार्डे, लग्न पत्रिका,आगपेटी ,अंगठ्या,लॉकेट्स,राख्या,ह्यांचा संग्रह आहे ह्या आमच्या मुलूखावेगळ्या छंदाची नोंद गणेश-विश्वकोषातही घेण्यात आलेली आहे॰ह्यामध्ये आपणास क्रिकेट खेळणारे गणपती,नाशापाणी करणारा गणेश,लॅपटॉप,अॅटॅची व मोबाइल घेतलेला आधुनिक गणेश,अश्वारूढगणेश,धनुर्धारीगणेश,पानाच्या डब्यावरील गणेश,अदृश्य गणेश,अंधकारमे गणेशा पासून ते लेसर गणेश व संगणकातून साकारलेल्या त्रिमिती गणेशा पर्यन्त गणेशाची विविध मोहक रुपे पाहावयास मिळतात. आतापर्यन्त टाइम्सऑफइंडिया,लोकसत्ता,एशियनएज,सकाळ,पुढारी,ऐक्य इत्यादि वृत्तपत्रातून व पुण्याचे न्यू जनरेशन टिव्ही न्यूज चॅनेलवर,तसेच पुणे,मुंबई,सातारा,कोल्हापूर इत्यादि ठिकाणाहून ह्या संग्रहाबद्दल लिहून आले आहे.
८) रुफ टॉप सोलर ग्रिड सिस्टिम :
कार्बन उत्सर्जन न होऊ देता वीज निर्मिती करून पर्यावरणास आपला हातभार लागावा या हेतूने आम्ही जुलैमध्ये आमच्या संपूर्ण वाड्यासाठी रुफ टॉप सोलर सिस्टिम म्हणजेच ड्युएल मीटर ग्रिड सिस्टिम कार्यान्वित केली आहे.
सोबत उपरोक्त सर्व उपक्रमांच्या प्रकल्पांचे काही निवडक फोटो सुद्धा सोबत दिलेले आहेत.
ह्या खेरीज लहानपणापासून मला विविध छंद होते त्याची थोडक्यात माहिती अशी :
लहानपणी मला खेळातील पत्त्यांच्या कॅटवरील विविध चित्राचे पत्ते जमविण्याचा एक छंद होता. पोस्टाची तिकिटे जमवणे व मोठ-मोठ्या व्यक्तींच्या स्वाक्षरया व संदेश जमवण्याचाही छंद मी काही वर्षे जोपासला. विविध चलनी नाणी व नोटा जमविण्याचाही छंद होता. कॉलेजमध्ये गेल्यापासून इमारतींची मॉडेल्स बनविण्याचा एक नावाचं छंद लागला होता व तिसर्या वर्षात असताना मे बनवलेल्या हॉटेलच्या प्रतिकृतीला त्यावर्षीचे पहिले पारितोषिक महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मा.मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण ह्यांच्याहस्ते मिळाले होते. मी जमवलेल्या स्वाक्षर्यात महर्षि.धोंडो केशव कर्वे,गानहिरा हिराबाई बडोदेकर , भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी , महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमात्व पु. ल. देशपांडे , विनोदी लेखक द.मा.मिरासदार अशांच्या स्वाक्षर्या होत्या.
प्रमोद तांबे